कृष्ण

कृष्ण म्हंटल की मन वेडं होतंच!मन धावत जातं त्याच्या मागे; रानावनात, नदी काठी, दर्‍या- खोर्‍यांतून, तो जाईल तिथे; मन वेड्यासारखं धावत जातं. त्याचं अस्तित्व जाणवेल ह्या एका आशेवर मन धावत जातं, शोधत राहतं कृष्णाला! आणि तो भेटतोच… प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत, वेदनेत, आनंदात, दुःखात, प्रेमात, विरहात सगळी कडे तो भेटतोच. साथ देत राहतो प्रत्येक वेळी.हातात हात घेतो आणि घेऊन जातो […]

या वळणावर

या वळणावरश्रावण झुलतोमेघ बहरतोपानो पानी रंग उधळतोया वळणावर या वळणावररात्र उतरतेनदी वाहतेचंद्र चांदणीमिलन घडतेया वळणावर या वळणावरराधा रमतेबकुळ माळतेदेह सावळाउगाच स्मरतेया वळणावर या वळणावरझुरे बासरीअंगावर सरीव्याकुळ होईसुनी ओसरीया वळणावर या वळणावरकळी उमललीराधा खुललीश्याम रंगी तीबहरून आलीया वळणावर या वळणावरकान्हा रुळलागोकुळ सजलापाव्या मधुनीसुर उमटलाया वळणावर या वळणावरश्रावण झुलतोअसाच दिसतोगौर – सावळाऋतू बरसतोया वळणावर                             

सय

धुकं लागते तरळूजसे रानात वनाततशी सय तुझी दाटेखोल खोल हृदयात दिसे अंधूक अंधूकजसे सारे ह्या धुक्यातमीही होत जाते धुंदतुझी आठव मनात धुके जाईल वाहूनआता पुढच्या क्षणालातू ही रुजशील ना रेवेड लावून जीवाला तुझा वास आहे खोलआत मनाच्या तळाशीजसे हरवते धूकेखोल झाडांच्या मुळाशी धुके बरसते पुन्हासर होऊन सावळीतू ही भिजवून जातोलाज डोळ्यात काजळी होते चिंब चिंब धरापुन्हा पांघरुन धुकेतुझ्या एका सयीपुढेमाझे […]

पैलतीरावर

बरेचदा आपण फक्त प्रश्नच घेऊन जगत असतो. हे असं का झालं? तसं का नाही झालं? किंवा भविष्यात असं होईल ना? नाही झालं तर मी काय करू?पण आजचा विचार कुठेच नसतो.. ह्या न बदलता येणाऱ्या भूतापायी आणि आजच आपण घडवू शकणार्‍या भविष्यासाठी आपल्या हातात असलेला आज आपण गमावून बसतो. बरेचदा तर आपल्या हातात उत्तरंही असतात सगळ्या प्रश्नांची.  पण आपलं प्रश्नांवर जास्त […]

error: Content is protected !!